Saturday, September 16, 2023

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन

                          मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त

                              मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन

·         बास्केटबॉल स्पर्धेस सुरुवात

·         विविध जिल्ह्यातील स्पर्धकाचा सहभाग

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :-  जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त खुले मॅरेथॉन स्पर्धेचे आज आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

 

यावेळी सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, मराठवाडा शासकीय पुनोनित माजी सैनिक संघटनेचे अध्यक्षजिल्हा व मंडळ अधिकारी महसुल श्री. पठाण, अथलेटिक्स संघटनेचे सचिव प्रलोभ कुलकर्णी आदी उपस्थीत होते.




 

ही मॅरेथॉन रॅली महात्मा फुले पुतळा (आयटीआय चौकयेथून  शिवाजीनगर मार्गे बस स्टॅन्ड कलामंदीर छशिवाजी महाराज पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय, चिखलवाडी कॉर्नर, ओव्हर ब्रीज, अण्णाभाऊ साठे चौक, व्ही.आय.पी.रोड, कुसुमताई सभागृह (आयटीएम कॉलेज), स्टेडीयम मार्ग, विसावा उद्यान हुतात्मा स्मारक येथे समाप्त करण्यात आली.

या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे.

खुले मॅरेथॉन पुरुष गटासाठी – प्रथम क्रमांक सगरोळी येथील छगण मारोती बोंबले, द्वितीय विष्णु विठठलराव लव्हाळे (सगरोळी), तृतीय-प्रदीप उदयसिंह राजपूत (संभाजीनगर), चौथा रोहित शिवाजी बिन्नर (नाशिक) , पाचवा सचिन रोहीदास पवार (परभणी) व सहावा विनय बालासाहेब ढोबळे (परभणी) यांनी प्राविण्य संपादन केले.







तर खुले मॅरेथॉन महिला गटात - प्रथम निकीता विठ्ठल मात्रे (परभणी), द्वितीय परिमाला बालासाहेब बाबर (परभणी), तृतीय वैष्णवी विनोद दुधमल (नांदेड), चौथा आरती बाळगीर गोस्वामी (एकनाथ पाटील अकॅडमी,नांदेड), पाचवा मंजुषा पुंडलिक राठोड (एकनाथ पाटील अकॅडमी,नांदेड), सहावा- सारीका अशोक भालेराव (एकनाथ पाटील अकॅडमी,नांदेड) यांनी प्राविण्य संपादन केले आहे.  पुरुष व महिला प्राविण्य स्पर्धकांना प्रथम क्रमांक 11 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 9 हजार रुपये, तृतीय क्रमांक 7 हजार रुपये, चौथा क्रमांक 6 हजार रुपये, पाचवा क्रमांक 5 हजार रुपये व सहावा क्रमांक 4 हजार रुपये असे एकुण 84 हजार रुपये रोख, मेडल, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.  या खुले मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्र राज्यातील संभाजीनगर, परभणी, यवतमाळ, बुलढाणा, जालना, अकोला, वाशिम, लातूर, उस्मानाबाद व इतर जिल्हयातील स्पर्धक मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. बक्षीस वितरण कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी खेळाडूंना मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाल्याबददल शुभेच्छा दिल्यानिरोगी शरीर राहण्यासाठी मैदानावर खेळ खेळणे महत्वाचे असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी सांगीतले.


यासाठी पंच प्रमुख म्हणुन प्रलोभ कुलकर्णी व  बंटी सोनसळे यांनी काम पाहीले. त्यांचे सोबत पंच व रॅडर म्हणुन  वैभव दमकोंडवार, गोविंद पांचाळ, प्रभु धुमाळ, सिध्दोधन नरवाडे, अजय राठोड, अन्वर महमद, शिवाणी कापसे, वैभव अंभोरे, राजर्षी पुयड, विशाखा, शेख आमेर, अरविंद कोकाटे, बुध्दभुषग गायकवाड, कांचन मस्के आदीनी काम पाहिले. याप्रसंगी गजानन फुलारी (जिम्नॅस्टिक्स संघटना), चंद्रकांत आढाव (शिकई मार्शल आर्ट संघटना) व जिल्हयातील विविध क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रलोभ कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन बालाजी शिरसीकर यांनी मानले.

 

ही मॅराथॉन स्पर्धा यशस्वी करणेसाठी क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोयर तर कार्यालयातील मोहन पवार, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, विद्यानंद भालेराव, ज्ञानेश्वर रोठे, सोनबा ओव्हाळ आदींनी परिश्रम घेतले.

 

तसेच जिल्हास्तर क्रीडा महोत्सव अंतर्गत बास्केटबॉल, बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेपैकी आज सायं 4 वा. बास्केटबॉल स्पर्धेस सुरुवात होणार आहे. यासाठी जिल्हयातील क्रीडाप्रेमीनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी केले आहे.

00000      

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...