Thursday, January 5, 2017

शासकीय अध्यापक महाविद्यालयात
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यास प्रारंभ
नांदेड, दि. 5 :-  शासकीय अध्यापक महाविद्यालयात 1 ते 15 जानेवारी 2017 हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा म्हणून साजरा केला जात आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ सोमवार 2 जानेवारी रोजी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे या होत्या. प्रास्ताविक प्रा. एस. एस. सोळंके यांनी केले. नैतिक मल्य रुजवणूक उपक्रमांतर्गत सुविचार वाचन व संकलन हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात महाविद्यालयामधील प्रथम व द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांनी शिक्षण क्षेत्रातीलच लोकांनी नव्हे तर इतर क्षेत्रातील लोकांनीही मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शासनाने सर्व विभागांना तसे सुचित केले आहे. महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीही उत्साहात साजरी करण्यात आली. यात परभणी आकाशवाणी केंद्रावरून तेजस्वीनी या कार्यक्रमांतर्गत प्राचार्या डॉ. रोडगे यांची थेट घेण्यात आलेली मुलाखत प्रसारित करण्यात आली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्या डॉ. रोडगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यापासून प्रेरणा घेवून वाटचाल करावी असे सूचित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. बेलोकर यांनी केले. निता मोरे यांनी  त्रसंचालन केले. आभार सुषमा शिरसे यांनी आभार मानले.

-------

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...