महिला
मतदार जनजागृती अभियानात
जास्तीत
नोंदणी करण्यात यावी - प्र. जिल्हाधिकारी पाटील
नांदेड दि. 21 :- जागतिक महिला
दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या महिला मतदार जागृती अभियानांतर्गत जास्तीत जास्त
महिला मतदारांची नोंदणी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देश प्रभारी
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज येथे दिले.
“आंतरराष्ट्रीय
महिला दिन” निमित्ताने महिला मतदार नोंदणीसाठी विशेष
कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या
पुर्वतयारीसाठी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून श्री. पाटील बोलत होते.
बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपक चाटे,
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. व्ही. शिंगणे, बालविकास प्रकल्प
अधिकारी डॅा. विजय खोमणे, माविमचे
चंदनसिंग राठोड आदींची उपस्थिती होती.
बैठकीत जिल्ह्यातील महिला मतदारांमध्ये
जागृतीसाठीचे विविध उपक्रम तसेच प्रत्यक्ष गावस्तरीय नियोजन करण्यासंदर्भात चर्चा
झाली. महिला मतदार जागृती संदर्भात भारत
निवडणूक आयोगाने “स्वीप” SVEEP (Systematic Voters Education and Elector
Participation) अंतर्गत निर्देश दिले आहेत.
त्यानुसार महिलांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महिला मतदारांची नोंदणी कमी आहे. ही तफावत “महिला
दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांद्वारे दूर करण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी महिला वसतीगृह, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर परिचारिका, महिला बचत गट, अशासकीय संस्था इत्यादिंच्या
मदतीने महिला मतदारांची नोंदणी वाढविणे. उद्योग, शिक्षण, सामाजिक, साहित्य, कला-संस्कृती
यासह विविध क्षेत्रातील अग्रणी महिलांच्या
माध्यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करणे. विवाहित महिलांची पूर्वीची नोंदणी
रद्द करून नवीन ठिकाणी त्यांची मतदार
म्हणून नोंदणी करणे. महिलांची मतदार नोंदणी वाढविणे यासाठी बीएलओ यांना विशेष
प्रशिक्षण / सूचना देणे. याबाबतही बैठकीत चर्चा
झाली.
जिल्ह्यात 89- नायगाव मतदारसंघ वगळता इतर सर्व
मतदारसंघात महिला मतदार नोंदणी गुणोत्तर प्रमाण
खूपच कमी आहे. त्यामुळे मतदान नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यासाठी कार्यक्रमही आखण्यात आला आहे. तो पुढीलप्रमाणे – गावनिहाय
संपर्क अधिकारी नियुक्त करणे (20 फेब्रुवारी). संपर्क अधिकारी,
अंगणवाडी सेविका / आशा वर्कर, तालुकास्तरावरील अधिकारी यांच्या बैठक घेणे (28 फेब्रुवारी). बीएलओ यांची बैठक घेउन त्यांना Form
6 / 8 A देणे ( 28 फेब्रुवारी). महाविद्यालयांचे
प्राचार्य / Campus ambassador यांची बैठक घेणे (28 फेब्रुवारी). BLO / Campus Ambassador यांनी
पात्र महिला मतदारांचे नोंदणीसाठी अर्ज भरून घेणे (28 फेब्रुवारी ते 6 मार्च 2017). यादीत नाव न
नोंदविलेल्या सर्व महिला मतदारांचे नमूना 6 किंवा नमूना 8 अ BLO यांनी तहसिल
कार्यालयात जमा करणे (6 मार्च). गावात /
वार्डात / तालुकास्तरावर महिला मेळावे आयोजित करून नवीन नोंदणी झालेल्या महिलांना EPIC वाटप
करणे ( 8 मार्च 2017).
जिल्ह्याची दि. 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारित प्रसिध्द मतदार यादीनुसार मतदारसंघ
निहाय महिलांचे दर हजारी प्रमाणे खालील प्रमाणे आहे.
महिला मतदार नोंदणीचे गुणोत्तर (दि. 1 जानेवारी 2017 पर्यंतच्या आधारावर)
|
|||||
विधानसभा मतदार संघ
|
पुरूष
|
स्त्रिया
|
अन्य
|
एकूण
|
गुणोत्तर
|
83-
किनवट
|
126446
|
115881
|
2
|
242329
|
914
|
84-
हदगाव
|
137641
|
122238
|
2
|
259881
|
885
|
85- भोकर
|
135562
|
124232
|
5
|
259799
|
915
|
86-नांदेड
दक्षिण
|
145955
|
132344
|
40
|
278339
|
908
|
87-नांदेड
उत्तर
|
137586
|
125361
|
1
|
262948
|
913
|
88- लोहा
|
135610
|
124225
|
1
|
259836
|
915
|
89- नायगाव
|
138794
|
128885
|
1
|
267680
|
937
|
90-
देगलूर
|
142006
|
130810
|
0
|
272816
|
922
|
91-
मुखेड
|
141870
|
128804
|
1
|
270675
|
914
|
एकूण
|
1241470
|
1132780
|
53
|
2374303
|
914
|
00000
No comments:
Post a Comment