Wednesday, December 8, 2021

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

1 कोटीपर्यंत निधी संकलन करण्याचा निर्धार 

दिनांक (जिमाका) दि. 8 :- जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2021-22 च्या संकलनाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावर्षी जिल्हयाला निधी संकलनाचे 45 लाख 30 हजार एवढे उद्दिष्ट असून हे उद्दिष्ट 1 कोटीपर्यंत करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हयातील वीरनारी, वीरपिता यांचा सत्कार तसेच विशेष गौरव पुरस्काराच्या 20 हजार रुपयाच्या धनादेशाचे वाटपही करण्यात आले. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अपर जिल्हाधिकारी श्रीमती दीपाली मोतीयेळे यांच्या प्रमुख उपस्थितीत निधी संकलनाची सुरुवात करण्यात आली.    

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकुर-घुगे यांनी माजी सैनिक व त्यांच्या महिला बचतगटास सर्वोतोपरी मदत केली जाईल. ध्वजनिधी जमा करण्यासाठी "हाच संकल्प हिच सिद्वी" हा उपक्रम राबवितांना प्रत्येक अधिकारी-कर्मचारी व नागरिकांना आवाहन करुन निधी जमा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

सन 2020-21 साठी शासनाने जिल्हयाला 35 लाख 50 हजार एवढे उद्दिष्ट दिले होते. नांदेड जिल्हयाने 85 लाख 27 हजार 971 एवढा निधी जमा करुन 241 टक्के उद्दिष्ट पुर्ण केले आहे. तसेच सन 2021-22 साठी शासनाकडुन 45 लाख 30 हजार एवढे उद्दिष्ट मिळालेले आहे. नांदेड जिल्ह्याने आता 1 कोटीपर्यंत निधी जमा करुन ते पूर्ण करू असे अपर जिल्हाधिकारी श्रीमती दीपाली मोतीयेळे यांनी सांगितले. दिलेले उद्दिष्ट वेळेच्या आत पूर्ण करुन निधी शासनास जमा केल्याबद्दल शासनाने नांदेड जिल्ह्याचा गौरव प्रित्यर्थ स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला आहे. 

ध्वन निधी संकलनात शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांनी मोलाचे सहकार्य केले त्यांचाही सत्कार अपर जिल्हाधिकारी श्रीमती दीपाली मोतीयेळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तु देवून करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात शहिदांना श्रद्वांजली वाहून करण्यात आली. सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी प्रास्ताविकात ध्वजदिन निधीचे महत्व सांगून संकलित झालेल्या निधीचा विनियोग व माजी सैनिकांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना कशा राबविण्यात येतात याची माहिती दिली. माजी सैनिकांसाठी सीएसडी कॅण्टीन, महिलांसाठी बचतगट व पूर्व प्रशिक्षण केंद्र नांदेड येथे सुरु करण्याची विनंती त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना केली. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन त्र्यंबक मगरे यांनी केले तर कल्याण संघटक अर्जुन जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हयातील जवळपास 200 माजी सैनिक, विधवा, अवलंबित उपस्थित होते. माजी सैनिक संघटनांचे अध्यक्ष रामराव थडके, पठाण हयुन, बालाजी चुगुलवार व प्रकाश कस्तुरे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यालयाचे बुध सिंग शिसोदे, बालाजी भेारगे, सुर्यकांत कदम व गंगाधर हटकर यांनी विशेष प्रयत्न केले.

0000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1145   सत्यापनकर्ता (व्हेरीफायर) लॉगिन मधून पीक पाहणी दुरुस्ती ची  कार्यपद्धत   नांदेड दि.  27   नोव्हेंबर :   संपूर्ण राज्या...