Wednesday, February 16, 2022

 मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट )

जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न 

 नांदेड (जिमाका) दि. 16 :-  मा. बाळासाहेब ठाकरे  कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट ) प्रकल्पा अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन आत्मा सभागृह नांदेड येथे करण्यात आले होते. यावेळी प्रकल्प संचालक (आत्मा) रविशंकर चलवदे यांनी नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या 8 शेतकरी उत्पादक कंपन्यांनी प्राथमिक स्तरावर सादर केलेल्या आराखडा विषयी माहिती दिली. तसेच दुसऱ्या टप्प्यातील 19 शेतकरी उत्पादक कपन्यांना प्राथमिक स्तरावर आराखडा तयार करण्यासाठी मान्यता देण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

आत्माच्या प्रकल्प  उपसंचालक माधुरी सोनवणे यांनी प्रकल्प आराखडे कसे तयार करायचे याविषयी सविस्तर माहिती दिली. मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातंर्गत विविध प्रकल्प आराखडे तयार करण्याबाबत सविस्तर माहिती सादरीकरणाव्दारे मंडळ कृषी अधिकारी संजय चातरमल यांनी दिली. कार्यशाळेमध्ये प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील 19 शेतकरी उत्पादक कंपन्यांचे अध्यक्ष, सचिव, संबंधित नोडल अधिकारी, सीए, सीएस तालुका तंत्रज्ञन व्यवस्थापक उपस्थित होते. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी श्रीहरी बिरादार, सतीश कांबळे यांनी परिश्रम घेतले.

00000


 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...