ऑटोरिक्षा परवानाधारकांना पोस्टात खाते काढण्याची सुविधा
सानुग्रह अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 17 :- राज्य शासनाच्यावतीने ऑटोरिक्षा परवानाधारकांना
1 हजार 500 रुपयाचे सानुग्रह अनुदान दिले
जाणार असून हे अनुदान ऑटोरिक्षा परवानाधारकांच्या बॅंक खात्यात ऑनलाईन जमा केले
जाणार आहे. ज्या परवानाधारकांनी बॅंकखाते आधारशी जोडले नाही किंवा आधारमधील काही
दुरुस्ती असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरातील आधार केंद्रात जाऊन आधारमधील
दुरुस्ती करुन घ्यावी. आधार दुरुस्तीसाठी गजानन मोरे यांचा संपर्क क्र. 8208224554
व निलकंठ कोकाटे संपर्क क्र. 9420846833 यांच्याशी
संपर्क साधून पोष्टात खाते उघडावे. ऑटोरिक्षा परवाना धारकांनी सानुग्रह
अनुदानासाठी अर्ज करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी
नांदेड यांनी केले आहे.
भारतीय टपाल विभागाकडून इंडीया पोस्ट पेंमेट बॅकेच्या
माध्यमातून पोष्टात झीरो बॅलन्स (शुन्य रक्कमेचे) खाते उघडण्यात येणार आहे. यासाठी
संबंधिताचे आधार कार्ड, पॅन
कार्ड, प्रत्यक्ष व्यक्ती पोष्टात गेल्यानंतर हे खाते
उघडण्याचे शुल्क 100 रुपये भरुन हे खाते उघडण्यात येणार आहे.
सदर शंरभर रुपये हे अनुदान जमा झाल्यानंतर काढता येतील.
सामुग्रह अनुदानासाठी 7 हजार 56 परवानाधारकांपैकी 4
हजार 979 ऑटोरिक्षा परवाना धारकांनी अर्ज केले
आहेत. यापैकी 3 हजार 361 अर्जाला मान्यता
देण्यात आली आहे तर 1 हजार 618 परवानाधारकांचे
अर्ज पुर्ननोंदणीसाठी पाठविण्यात आली आहेत. या योजनेच्या लाभासाठी सर्व ऑटोरिक्षा
परवाना धारकांनी आपल्या नजीकच्या पोष्ट कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन खाते उघडावे असे
आवाहन टपाल विभाग व प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने केले आहे.
0000
No comments:
Post a Comment