पत्रकार परिषद निमंत्रण
दि. 28 ऑगस्ट 2018
प्रति ,
मा. संपादक / प्रतिनिधी
दैनिक वृत्तपत्र /
दूरचित्रवाणी / केबल टि.व्ही.
नांदेड जिल्हा
विषय
- पत्रकार परिषदेचे
निमंत्रण...
संदर्भ
- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांचे पत्र क्र.
2018/साशा-3/निवडणूक/मयापु/ CR-23 दि. 28.8.2018
महोदय ,
उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये मतदार यादीबाबत दिनांक 1 जानेवारी
2019 या अर्हता दिनांकावर आधारीत 1 सप्टेंबर 2018 ते 31 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम
राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जास्तीतजास्त मतदारांना सहभागी करुन घेण्यात
येणार आहे. या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मा. श्री. अरुण
डोंगरे, जिल्हाधिकारी नांदेड हे शनिवार दि. 1 सप्टेंबर 2018 रोजी जिल्हाधिकारी
यांचे कक्षात सायं. 4.30 वा. पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
कृपया पत्रकार परिषदेस आपण किंवा आपला प्रतिनिधी, छायाचित्रकार, कॅमेरामन
यांनी वार्तांकनासाठी उपस्थित रहावे, ही
विनंती.
वार व
दिनांक - शनिवार,
दि. 1 सप्टेंबर, 2018
स्थळ - जिल्हाधिकारी नांदेड यांचे कक्ष
वेळ - सायं. 4.30 वा.
आपला विश्वासू
स्वा /-
जिल्हा
माहिती अधिकारी,
नांदेड
No comments:
Post a Comment