Friday, December 2, 2016

नांदेड दक्षिण, उत्तर मतदारसंघातील
मतदारांना छायाचित्रांबाबत आवाहन
नांदेड, दि. 2 :- तालुक्यातील 86- नांदेड उत्तर व 87- नांदेड दक्षिण या मतदारसंघातील मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या नावांची महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रभागात याद्यांचे वाचन करुन प्रसिद्धी देण्यात येणार आहे. रविवार 4 डिसेंबर 2016 पर्यंत मतदारांनी आपली छायाचित्रे तहसिल कार्यालय, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा मनपा नोडल अधिकारी यांचेकडे जमा करावेत, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.
आजपर्यंत अनेक माध्यमातून याबाबत मतदारांना आवाहन करण्यात आले असल्याचे निवडणूक विभाग तहसिल नांदेड यांनी सांगितले. जिल्हा संकेतस्थळ, मनपा कार्यालयात, पंचायत समिती व प्रत्येक मतदान केंद्रावर याद्यांची प्रसिद्धी देण्यात आली आहे. तसेच स्थानिक प्रसार माध्यमांद्वारे टिव्ही, आकाशवाणी, वृत्तपत्र इत्यादीद्वारे आवाहन केले आहे. पुन:श्च अंतिम सूचना मतदारांना याद्वारे देवून आवाहन करण्यात येते की  यादीची पाहणी करुन विहित मुदतीत छायाचित्रे जमा करावेत अन्यथा यादीतून नावे वगळण्याची कार्यवाही करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घेवून राष्ट्रीय मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमास सहकार्य करावे, असेही आवाहन सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार पी. के. ठाकूर नांदेड यांनी केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment

 उपसंचालक अनिल आलूरकर यांना मातृशोक  नांदेड दि. 15 जानेवारी : नांदेड येथील मूळ निवासी असणारे व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अमरावती येथ...