Monday, September 9, 2019


कुष्ठरोग शोध अभियानाची
जिल्हा समन्वय समितीची सभा संपन्न
                  नांदेड दि. 9 :- जिल्ह्यातील जनतेच्या व जिल्हा प्रशासनाच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्ताने केंद्र शासनाने ऑक्टोंबर 2020 पर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यातून कुष्ठरोगाचे दुरीकरण साध्य करणे हे उद्दीष्ट निश्चित केले आहे.
                  भारत सरकारच्यावतीने सन 2003 पासून राज्यामध्ये सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सन 2025 पर्यंत देश क्षयरोग मुक्त करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.
                  वाढत्या आर्युमानाच्या पार्श्वभुमीवर आरोग्य संक्रमनात असंसर्गजन्य रोगामुळे 63 टक्के मृत्यू संभावतात. सर्वसाधारणपणे उच्चरक्त दाब, मुधमेह, कर्करोग, श्वसनदाह यांचा समावेश प्रमुख अससंर्गजन्य रोगाअंतर्गत होतो.  बदल्या जीवन शैलीमुळे या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे सिद्ध झाले आहे.
                  यावर्षी राज्यात व जिल्ह्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार 13 सप्टेंबर 2019 ते 28 सप्टेंबर 2019 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान, सक्रीय क्षयरोग शोध मोहिम व असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरुकता अभियान राबविण्याचे ठरवले आहे. या अभियानात आशा कार्यकर्ती व पुरुष स्वयंसेवकामार्फत घरोघरी भेट देवून घरातील सर्व सदस्यांची तपासणी करुन संशयीत रुग्ण शोधणार आहेत. शोधलेल्या संशयितांची त्वरीत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करुन निदान निश्चित करुन मोफत उपचार करण्यात येणार आहे.
                  त्यासाठी जिल्ह्यात 2 हजार 692 टिम नियुक्त करण्यात आल्या आहेत. या टिमच्या पर्यवेक्षणासाठी 362 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी 7 सप्टेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा घेण्यात आली. या सभेला जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. व्ही. आर. मेकाने, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, शिक्षणाधिकारी, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, त्वचारोग तज्ज्ञ डॉ.  हजारी, श्री. टाकळकर, गाजुलवार, मोटरगे, पाटील आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कुष्ठरोग शोध अभियानात प्रत्येक घरोघरी जाऊन सर्व नागरिकांची कटाक्षाने तपासणी करण्याचे आदेश दिले व नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन केले, अशी माहिती सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) नांदेड यांनी दिली.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...