Monday, October 12, 2020

 

 नांदेड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाकडून

अधिकृत 705 माथाडी कामगारांना मदत    

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे नांदेड जिल्ह्यातील नोंदणीकृत माथाडी कामगारांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने मंडळाच्या राखीव निधीमधून यथाशक्य मदत व्हावी असे निर्देश सहाय्यक कामगार आयुक्त तथा माथाडी मंडळाचे अध्यक्षांनी नांदेड जिल्हा मंडळाला दिले होते. याप्रमाणे नांदेड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाने एक ठराव घेऊन मंडळाच्या राखीव निधीमधून प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाप्रमाणे मंडळातील 705 माथाडी कामगारांना एकुण 21 लाख 15 हजार रुपयाची आर्थिक मदत माथाडी कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. 

ही मदत माथाडी कामगारांना पोहचावी यासाठी राज्याचे कामगार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय झाला होता. आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते या मदतीचा प्रातिनिधीक धनादेश नांदेड हमाल माथाडी हातगाडा संघटनेचे सचिव भुजंग कसबे, विनायक सुर्यवंशी, शिवाजी दराडे, ट्रान्सपोर्ट ॲड डॉक वकर्स युनियनचे सहसचिव शिलन सोनकांबळे, मैनोद्दीन पठाण, प्रतापसिंह ठाकूर, प्रभाकर वाघमारे यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा सहाय्यक कामगार आयुक्त मोसीन सय्यद, मंडळाचे सचिव अविनाश देशमुख, निरिक्षक डी. पी. फुले, व्हि. एच. पाटील, एम. एम. नाईक आदी उपस्थित होते.

00000




 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...