कार्यालये, कार्यस्थळे, कारखाने आणि आस्थापनांमध्ये
सामाजिक अंतर राखण्यासाठी मानक कार्यप्रणाली
नांदेड, दि. 19:- सर्व कार्यालये, कार्यस्थळे, कारखाने आणि आस्थापनां मध्ये खालील उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. यात परिसरातील जंतुनाशकांचा वापर करून संपूर्ण निर्जंतुकीकरण केले जावे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात नमुद केले आहे.
इमारत, कार्यालयाचे प्रवेशद्वार इ. , कॅफेटेरिया व कॅन्टीन, बैठक कक्ष,कॉन्फरन्स हॉल, उपलब्ध मोकळी जागा, व्हरांडा, प्रवेशद्वाराचे गेट/फाटक, बंकर्स, कॅबिन, इ. इतर साहित्य तसेच लिफ्ट , बाथरुम, प्रसाधनगृहे, पाण्यााचे ठिकाणे, भिंती व इतर सर्व पृष्ठंभाग, सार्वजीनक इमारतीतील सर्व वॉश बेसिन्सच्या नळांना तोटया बसविण्यात यावे. बाहेरुन येणा-या कामगारांसाठी विशेष वाहतूक व्य्वस्था संबंधीत कार्यालयप्रमुख / आस्था्पना प्रमुख यांनी करावी. त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्य्वस्थेनवर अवलंबून राहावे लागू नये.वाहन क्षमतेच्या 30 ते 40 % प्रवासी वाहतुक करण्यानस परवानगी असेल. कार्यालयाचे आवारात येणारी सर्व वाहने निर्जंतुक करुन घ्या्वीत. शासकिय आवारात /कार्यालयाचे आवारात प्रवेश करणा-याची अनिवार्यतेने थर्मल स्कॅनिंग करुन घ्या्वी. स्पर्श न करता वापरता येण्याजोगे हात धुण्यारकरिताची साधने, पुरेशा प्रमाणातील सॅनिटायजर्स प्रवेशद्वाराजवळ तसेच निर्गमन द्वाराजवळ ठेवण्यात यावे. कामाच्या ठिकाणी शिफ्ट दरम्यान एक तासाचे अंतर असेल आणि सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या भोजन अवकाश कालावधीमध्ये शिथीलता ठेवावी. 10 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग असेल अशा बैठका टाळाव्या्त. कामाच्या ठिकाणी, बैठकीनिमित्त जमावाचे ठिकाणी एकमेकापासून 6 फूट अंतरावर बैठक व्यावस्था असावी. लिफ्टमध्ये एकावेळी 2/4 व्यीक्तीस (त्या ंचे आकारमानानुसार) प्रवेश द्यावा. चढण्यासाठी जिन्या च्यार वापरास प्रोत्साहन द्यावे
गुटखा, तंबाखू यावर कडक निर्बंध असुन सार्वजनीक ठिकाणी थुंकण्याास सक्त मनाई आहे. दोषी व्यक्तीं विरुध्द आदेशातील नमुद तरतुदीनुसार कारवाई करावी. अनावश्यक अभ्यागतांना शक्यतो टाळावे.
कोविड रूग्णांवर उपचार करण्यास अधिकृत असलेल्या जवळपासच्या भागातील रूग्णालयांची नोंद करुन घ्यावी आणि सदर दवाखान्यांची यादी कामाच्या ठिकाणी उपलब्ध असावी. सर्व तालुक्याचे तहसिलदार तथा ईन्सीडेंट कमांडन्ट् हे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये होणा-या अत्यावश्याक हालचाली करीता पासेस वितरण करतील. जसे सूट दिलेली कार्यालये, कामाच्या ठिकाणे, कारखाने व आस्थापनांमधील कर्मचारी इत्यादी. अशा दिलेल्या. सर्व पासच्या प्रती स्थानिक पोलिसांना अग्रेषित करावे.
00000
No comments:
Post a Comment