वृत्त क्र. 67
समाज कल्याण विभागाच्या नांदेड येथील
विभागीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
नांदेड दि. 17 जानेवारी :- विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळाला महत्त्व दिले पाहिजे कारण याच विद्यार्थ्यामध्ये भविष्यातील सचिन तेंडुलकर दडला आहे, असे प्रेरणादायी विचार समाजकल्याणचे विभागीय प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी व्यक्त केले.
समाज कल्याण विभागीय क्रीडा स्पर्धा-2025 नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा प्रांगणात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलसचिव शशिकांत ढवळे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, सेवानिवृत्त समाजकल्याण अधिकारी बी. एस. दासरी, विद्यापीठाचे सहा.अधिक्षक सुनिल ढाले उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या मानसिक व शरिरीक सर्वांगिन विकासासाठी खेळ हे अविभाज्य घटक असल्याचे मत प्रास्ताविक समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी व्यक्त केले. मराठवाड्या
विभागीय क्रीडा स्पर्धा प्रथमच नांदेड जिल्ह्यात घेण्यात येत असून त्या उत्साहात सुरू झाल्या. या स्पर्धेत नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली येथील अनु.जाती मुला-मुलींचे शासकिय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी खेळाडूंचे जिल्हानिहाय पथसंचलन करून मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. विविध जिल्ह्यातून जवळपास 500 वि
000
No comments:
Post a Comment