Wednesday, November 25, 2020

 कंधार, नांदेड व गोकुंदा किनवट येथील

दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रात बदल 

नांदेड (जिमाका) 25 :- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकानिमित्त दिनांक 1 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील निवडक ठिकाणी जी मतदान केंद्र देण्यात आली आहेत त्या मतदान केंद्रांवर चार ठिकाणी दहावी व बारावीच्या परीक्षांची केंद्र देण्यात आली होती. निवडणुकांचा कालावधी व स्वरुप लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील कंधार, नांदेड व गोकुंदा किनवट या ठिकाणच्या परीक्षा केंद्रात केवळ एक दिवसासाठी पुढील प्रमाणे बदल करण्यात आला आहे. 

मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत इयत्ता दहावीच्या विज्ञान तंत्रज्ञान-1 या विषयाच्या मनोविकास विद्यालय कंधार ऐवजी मनोविकास प्राथमिक विद्यालय, एसबीआय एटीएमजवळ कंधार नवीन परीक्षा केंद्र राहिल. श्री शिवाजी विद्यालय पानभोसी रोड कंधार ऐवजी श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय, पानभोसी रोड कंधार तर श्री शारदा भुवन हायस्कुल, जुनामोंढा नांदेड ऐवजी गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालय गाडीपुरा बालाजी मंदीराजवळ नांदेड हे नवीन परीक्षा केंद्र राहिल. 

मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10.30 वा. ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत इयत्ता बारावीच्या गणित व संख्याशास्त्र या विषयाची महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा ता. किनवट या परीक्षा केंद्रा ऐवजी महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विदयालय, उत्तर प्रवेशद्वार (मस्जिदच्या बाजूने) गोकुंदा ता. किनवट हे नवीन परीक्षा केंद्र असेल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...