Monday, March 18, 2019


मतदारांनी मतदार यादीत
नाव असल्याची खात्री करुन घ्यावी
नांदेड दि. 18 :- नांदेड लोकसभा मतदारसंघाअंतर्गत 86- नांदेड उत्तर नांदेड विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मतदार यादीत नाव असल्याची खात्री करुन घ्यावी. मतदार यादीत नाव शोधण्यासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तहसिल कार्यालय नांदेड येथे जाऊन पडताळणी करता येईल किंवा मोबाईल, संगणकावर www.votersearch.gov.in या संकेतस्थळावर नाव शोधू शकतात.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी मतदान होत असून मतदार यादीत नाव असलेल्या सर्व मतदारांना मतदान करण्याचा अधिकार आहे. मतदान करण्यासाठी जाताना मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे. परंतू ज्या मतदारांना अद्याप मतदान ओळखपत्र मिळालेले नाही किंवा त्यांच्याकडील मतदान ओळखपत्र गहाळ झाले असेल तर त्यांनी पुढील पुरावे मतदान अधिकारी यांना दाखवून मतदान करु शकतात.
पासपोर्ट, ड्रायव्हींग लायसन्स, कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकेचे / पोस्टाचे पासबुक, पॅनकार्ड, स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, आरोग्यविमा स्मार्ट कार्ड, छायाचित्रासह असलेले सेवानिवृत्त वेतन कागदपत्रे, खासदार, आमदार यांना वितरीत केलेले ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी एक ओळखपत्र दाखवता येईल.
मतदान करणे हा या अधिकाराचा वापर सर्व मतदारांनी  करावा, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...