Saturday, March 3, 2018


मराठा समाज आरक्षणासंदर्भात
नांदेडला 5 मार्च रोजी सुनावणी ;
संबंधितांना निवेदने सादर करण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 3 :- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा उच्च  न्यायालयाचे  सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड हे मराठा समाजास आरक्षण देण्यासंदर्भात सुनावणी सोमवार 5 मार्च 2018 रोजी नांदेड येथील मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृहा सकाळी  10 ते सायं 5 यावेळेत घेणार आहे. या विषयाशी संबंधीत ज्ज्ञ, समाजसेवक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते यांनी लेखी निवेदने आवश्यक त्या कागदपत्रांसह आयोगासमोर सादर करावे,  असे आवाहन संपर्क अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक आर्थिक मागासलेपण तसेच शासकीय नोकऱ्यांमध्ये असलेले प्रमाण याविषयी शासनास अहवाल सादर करण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा मा. उच्च  न्यायालयाचे  सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड येणार आहेत. त्यांचे समवेत डॅा. सर्जेराव निमसे- तज्ञ सदस्य, . राजाभाऊ करपे- सदस्य, रोहीदास जाधव, सदस्य या मान्यवरांचा समावेश आहे, असेही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...