Monday, March 5, 2018


महिला दिनानिमित्त
आरोग्य तपासणी शिबीर
नांदेड, दि. 5 :- जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 78 मार्च रोजी सकाळी 10 ते 2 यावेळेत स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड व जिल्हा रुग्णालय छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ वजिराबाद नांदेड येथे 30 वर्षावरील सर्व स्त्रियांसाठी उच्चरक्तदाब, महुमेह व स्त्रीगर्भाशय कर्करोग संबंधीत (PAP SMEAR) तपासणी करण्यात येणार आहे. तसेच जनजागृतीपर पोस्टर्स प्रदर्शन करण्यात येणार असून हे प्रदर्शन 7 8 मार्च रोजी सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. सर्वांनी या तपासणी शिबीर व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...