Monday, March 5, 2018


"उज्ज्वल नांदेड" अंतर्गत आज
पर्यावरण परिस्थितीवर मार्गदर्शन    
नांदेड, दि. 5 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या उज्ज्वल नांदेड अभियानांतर्गत मंगळवार 6 मार्च 2018 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे करण्यात आले आहे.
या शिबिरात पुणे येथील डॉ. तुषार घोरपडे हे पर्यावरण परिस्थिती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मनपा आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची उपस्थिती राहणा आहे. या शिबिरास स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   मिशन लक्ष्यवेध जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रा अंतर्गत खेळाडू निवड चाचणी आयोजित  नांदेड दि. 30 मार्च:- क्रीडा व य...