Friday, January 24, 2025

 वृत्त क्र.  95

समाजकल्याण विभागामार्फत घर घर संविधान उपक्रम 

नांदेड दि.२४ जानेवारी : प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना तसेच संविधानानुसार काम करणाऱ्या सर्व यंत्रणेतील अधिकारी/कर्मचारी यांनाही संविधानाची ओळख करून देण्याच्या अनुषंगाने  भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सन 2024-25 पासून संविधान अमृत महोत्सव सन 2024-25 घर घर संविधान उपक्रम साजरा करण्‍या बाबत शासनाने कळविले आहे. 

भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबदल सर्व नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी सन २०२४-२५ या अमृत महोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ "घर घर संविधान" हा कार्यक्रम वर्षभर साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय, दिनांक १० ऑक्टोबर, २०२४ अन्वये निर्गमित करण्यात आल्या असून   २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिना निमित्त संविधान अमृत महोत्सव निमित्त घरघर संविधान कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.यास्तव महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण नांदेड कार्यालया कडून संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार आहे.

तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालया अधिनस्त शासकिय वसतिगृह शासकिय निवासी शाळा येथे २६ जानेवारीला भारतीय संविधानावद्दल माहिती देणारे कार्यक्रमही आयोजीत करण्यात येणार आहेत. ठिकठिकाणी संविधानाच्या प्रस्ताविकेचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करून "घर घर संविधान" हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार असून.  मा. पालक मंत्री महोदयांच्या हस्ते 26 जानेवारी प्रजास्ताक दिनाचे ध्वज रोहण होताच मा. पालकमंत्री महोदयांच्या हस्ते संविधान उद्देशिकेचे प्रति मान्यवरास देण्यात येणार आहे. 

सदर 26 जानेवारी प्रजासताक दिना निमीत्त भारतीय संविधानास 75 वर्ष पुर्ण झाल्या निमित्ताने संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात येणार असून नांदेड जिल्हयातील सर्व नागरीकांनी यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...