नांदेड
विधानपरिषद निवडणुकीसाठी
डॉ.
जगदीश पाटील निवडणूक निरीक्षक
नांदेड
दि. 2 :- महाराष्ट्र विधान
परिषदेच्या नांदेड स्थानीक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत
निवडणूक आयोगाने डॉ. जगदीश पाटील यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली
आहे. त्यासाठी डॉ. पाटील आज नांदेड येथे दाखल झाले आहेत. डॉ. पाटील या निवडणूक
प्रकियेबाबत कामकाज पाहतील.
विधानपरिषद
निवडणुकीच्या जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार व भारत निवडणूक आयोगाने विहित
केलेल्या प्रक्रियेबाबत डॉ. पाटील निवडणूक यंत्रणेकडून आढावा घेतील. डॉ. पाटील हे भारतीय
प्रशासकीय सेवेतील अधिकारी असून सध्या ते “बेस्ट” मुंबईचे
महाव्यवस्थापक आहेत.
डॉ. पाटील
यांच्याकडे निवडणूक कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत तसेच आचारसंहिता आणि
अनुषंगीक बाबींबाबत त्यांच्याकडे सूचना, माहिती , तक्रारी दाखल करता येतील. त्यासाठी
ते गुरुवार 3 नोव्हेंबर ते शनिवार 5 नोव्हेंबर या कालावधीत दुपारी 3 ते 4 यावेळेत
जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपलब्ध राहतील. त्यांचा संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक –
8879222001 असा आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक
कार्यालयाच्यावतीने केले आहे.
000000
No comments:
Post a Comment