Wednesday, July 17, 2019


बांधकाम कामगारांना 
नोंदणी करण्याचे आवाहन  
नांदेड दि. 17 :- राज्य शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या रोजगार व सेवाशर्तीचे नियमन करणे व त्यांना सुरक्षा, आरोग्य व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनेसाठी जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांनी नोंदणी करावी असे, आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन सय्यद यांनी केले आहे.
मंडळाने नोंदणीसाठी निश्चित केलेले शुल्क 37 रुपये व त्यापुढील वर्षाच्या नुतनीकरणासाठी वार्षिक 12 रुपये इतके शुल्क भरणा करावे. याव्यतिरिक्त कोणतेही शुल्क कामगारास लागत नाही. याबरोबर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळामार्फत सेफ्टी / इसेशियल कीट सुद्धा नि:शुल्क देण्यात येत आहे.
सद्यस्थितीत या मंडळाचे कामकाज सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड कार्यालयामार्फत चालविण्यात येत आहे. शासन अधिसूचनेद्वारे बांधकामाच्या व्याखेत समावेश करण्यात आलेल्या 21 बांधकाम व्यवसायाशी निगडीत व्यवसायात काम करणाऱ्या कामगाराचे वय 18 वर्षापासून ते 60 वर्षाच्या आतील कामगारांची नोंदणी करण्यात येते. नोंदणी व नुतनीकरण करण्यासाठी दरवर्षाला माघील 12 महिन्यात 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र शासनाने वेळोवेळी प्राधिकृत केलेल्या यंत्रणेकडून प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ वाटप केले जाते. या योजनांमध्ये बांधकाम कामगारासह त्याची पत्नी व अपत्यांचा देखील समावेश असून त्यांना प्रसुतीसाठी अर्थसहाय्य, गंभीर आजाराच्या उपचारासाठी अर्थसहाय्य, कामावर असताना अपघातामुळे अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य, कामगारांचे स्वत:चे विवाहासाठी अर्थसहाय्य, कामगारांच्या अपत्यांना पहिली पासून ते पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य आदी विविध योजनाद्वारे अर्थसहाय्य वाटप केले जाते. कामगारांनी खाजगी एजंटापासून सावधान रहावे, असेही आवाहन कामगार कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.   
00000     

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...