प्रज्ज्वला
योजनेतून महिलांचे सक्षमीकरण
- प्रज्वला समितीच्या
अध्यक्षा दिपाली मोकाशे
येथील स्टेडियम
परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आज आयोजित महाराष्ट्र राज्य महिला
आयोगाच्यावतीने प्रज्ज्वला योजनेतंर्गत बचतगटांचे प्रशिक्षण आयोजन करण्यात आले
होते. यावेळी महापौर श्रीमती दिक्षाताई धबाले, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर,
बालकल्याण समितीच्या उपसभापती डॉ. अरशया कोशर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, मनपा आयुक्त
लहुराज माळी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र
रोटे, गुरुप्रितकौर सोडी, दिलीप
कंदकुर्ते अदिंची यावेळी उपस्थिती होती.
महिलांसाठी विविध कायदे
आहेत, त्या कायद्याची माहिती व्हावी, त्याचबरोबर
महिलांसाठी विविध शासकीय योजना राबविण्यात येतात. या योजनांचा त्यांना लाभ घेता
यावा, यासाठी या प्रज्ज्वला योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण
कार्यक्रम बचतगटांसाठी आयोजित केलेले आहे. तसेच बचत गटांच्या महिलांनी उत्पादित
केलेल्या वस्तूंचे मार्केटींग, विक्री करण्यासाठी शहरात जागा,
अशा पध्दतीने काम केले जात आहे.
जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणाचे सदस्य सचिव राजेंद्र रोटे म्हणाले की, कायदेविषयक माहिती महिलांनी घेणे
आवश्यक आहे. महिलांनी कायद्याची माहिती करुन घेणं आणि महिलांच्या कायद्याची
जनजागृती होणे आवश्यक आहे, असे ही श्री. रोटे यांनी
सांगितले.
नांदेड विशेष पोलीस
महानिरीक्षक प्रकाश मुत्याल म्हणाले की, महिलांना त्यांच्या अधिकाराची जाणीव व्हायला हवी.
महिलांनी सदैव सक्षम व्हावं, अशीही श्री. मुत्याल यांनी
अपेक्षा व्यक्त केली.
बचत गटाच्या माध्यमातून
उत्पादित वस्तूंची बाजारपेठ, त्यासाठी विक्री व्यवस्था, विविध
योजनांचा त्याचा लाभ घेण्यासाठी करावयाची कार्यवाही आदिंची तपशीलवार माहिती
दिली. राज्य महिला आयोगाने प्रकाशित केलेल्या सखी संवाद, कायदे
तुमच्यासाठी, प्रज्ज्वला या पुस्तिकांचे वाटप बचत गटाच्या
महिलांना करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन जिल्हा समन्वयक माधव डोम्पले, आभार महाराष्ट्र महिला आयोगाच्या जनसंपर्क अधिकारी
कपालिनी सिनकर प्रास्ताविक केले तर जिल्हा संरक्षण अधिकारी गणेश जोंधळे यांनी आभार
मानले.
00000
No comments:
Post a Comment