सुदृढ नागरिकांनी नियमितपणे रक्तदान करावे
-
प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश
कामत
नांदेड (जिमाका) दि. 2 :- कोवीड-19 प्रादुर्भावमुळे वैद्यकीय यंत्रणेला रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सामाजिक भान ठेवून सुदृढ नागरिकांनी नियमितपणे रक्तदान करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले. "32 वा रस्ता सुरक्षा अभियान 2021" निमित्ताने नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे अपघाताच्यावेळी करावयाच्या प्रथमोपचाराचे प्रात्याक्षिक व मार्गदर्शन शिबीराचे आज आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
रस्ते अपघात व त्याद्वारे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याच्याहेतूने "32 वा रस्ता सुरक्षा अभियान 2021" नांदेड जिल्हयातील 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे. रस्ते वाहतुक नियमांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. यानिमित्त आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी, नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी यावेळी केले.
या आरोग्य तपासणी शिबीरात कार्यालयात आलेल्या अर्जदारांची तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी, रक्तदाब, मधूमेह व एचआयव्ही तपासणी करण्यात आली. रक्तदान शिबीरासाठी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील डॉ. पुजा नागरगोजे, डॉ. निशा गवरवार, डॉ. शरद अवचार,डॉ. भोंग, श्री. भालेराव यांच्या वैद्यकीय पथकाने सहभाग घेतला. श्री गुरुगोबिंदसिंघ सामान्य रुग्णालयाच्या डॉ. उमेश मुंडे, डॉ. शिंदे, श्रीमती शिल्पा सोनाळे, श्री. सुवर्णकार यांनी आरोग्य तपासणी केली. तसेच श्री. शेख यांनी नेत्र तपासणीसाठी सहकार्य केले. सहभागी नागरिकांच्या एचआयव्ही तपासणीसाठी डॉ. कुलदीप अंकुशे, डॉ. पंडागळे, श्री. सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी
अनंत भोसले, राहूल जाधव, मोटार
वाहन निरीक्षक पद्माकर भालेकर, अमोल आव्हाड, मुख्य लिपीक
राजेश गाजूलवाड, वरिष्ठ लिपीक
श्रीमती जयश्री वाघमारे, नंदकिशोर कुंडगीर
व प्रदिप बिदरकर यांच्यासह नांदेड
येथील मोटार ड्रायव्हींग स्कूल
संचालक यांनी परिश्रम घेतले.
0000
No comments:
Post a Comment