Saturday, August 17, 2019


"सदभावना दिवस", "सामाजिक ऐक्य पंधरवडा"
साजरा करण्याचे जिल्हा प्रशासनाचे निर्देश
नांदेड दि. 17 :- माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा जयंती दिवस 20 ऑगस्ट हा "सदभावना दिवस" म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2019 या कालावधीत "सामाजिक ऐक्य पंधरवडा" साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.
सदभावना दिवस व सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्याचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, जिल्हा परिषद नांदेड , मनपा नांदेड, पोलीस अधीक्षक नांदेड, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड, विभागीय शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण, समाज कल्याण, जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरु युवा केंद्र या कार्यालयांनी अल्पसंख्याक विकास विभागाच्या 11 ऑगस्ट 2017 रोजीच्या शासन परिपत्रकातील सुचनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करावे. कार्यक्रम साजरा करुन कार्यवाहीचा अहवाल नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.
हा पंधरवाडा साजरा करण्यामागे राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्माच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना सौहार्द भाव वृद्धीगंत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दीष्टे आहेत.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...