Saturday, August 17, 2019


अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 नियम नियमन 2011
गुटखा, पानमसाला तत्सम पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई
नांदेड दि. 17 :- अन्न औषध प्रशासन .राज्य, नांदेड येथील अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी नुकतेच शेख जैनुल पि.शेख गफार, रा. मोमीनपुरा, माहूर यांचे आलु-कांद्याचे दुकान, मांडवी रोड सारखणी ता.किनवट येथून शेख जैनुल पि.शेख गफार या व्यक्तीच्या ताब्यातून प्रतिबंधित अन्नपदार्थ गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखु इत्यादींचा 43 हजार 908 रुपयाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधिताविरुध्द पोलीस स्टेशन सिंदखेड ता. माहूर येथे अन्न सुरक्षा कायदा भा..वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच सिंदखेड येथील पोलीसांनी विजय दशरथ राठोड रा.मलकागुडा तांडा ता.माहूर या व्यक्तीच्या ताब्यातून प्रतिबंधित अन्नपदार्थ गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखु इत्यादींचा रुपये 19 हजार 270 रुपयांचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी संबंधिताविरुध्द पोलीस स्टेशन, सिंदखेड ता.माहूर येथे अन्न सुरक्षा कायदा भा..वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे. 
या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तु.चं.बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. प्रतिबंधित अन्न पदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायीकाविरुध्द यापुढे नियमित कार्यवाही घेण्यात येणार असून सदर अन्नपदार्थ कोणीही छुप्या, चोरटया पध्दतीने विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये, असे आवाहन नांदेड अन्न औषध प्रशासन यांच्याकडून करण्यात आले आहे.
प्रतिबंधीत अन्नपदार्थाचे संदर्भात या प्रकरणात अन्नसुरक्षा मानदे कायद्याअंतर्गत कमीतकमी सहावर्षाची कारावास पाच लाख रुपये द्रव्यदंडाच्या शिक्षेची तरतुद आहे, अशी माहिती तु. च. बोराळकर सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नांदेड यांनी दिली आहे.  
00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...