राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त
सामाजिक न्याय दिनी समता दिंडीचे आयोजन
- जिल्हा व तालुकास्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार
नांदेड, दि. 25:- राजर्षी छत्रपती
शाहु महाराज सत्तेवर कार्यरत
असतांना आपल्या कार्य कालावधीत
सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी सदैव
दक्ष होते. समाजातील दुर्लक्षित
मागासवर्गीय दुर्बल घटकांच्या प्रती
त्यांचा दृष्टीकोन विशेष
सहानुभुती पुर्वक होता. मागासवर्गीय,
दिव्यांग, वृध्द, निराधार, दुर्बल इत्यादी
घटकांच्या कल्याणार्थ त्यांनी अनेक
निर्णय अंमलात आणले. त्यांचा
आदर्श समाजापुढे विशेषत्वाने यावा
या दृष्टीकोनातुन त्यांचा
जन्मदिवस दिनांक 26 जून प्रतिवर्षी
सामाजिक न्याय दिन म्हणुन
साजरा करण्याचा निर्णय शासनाने
सन
2003 पासुन घेतलेला आहे.
त्याअनुषंगाने सन 2003 पासुन
जिल्हा स्तरावर तालुकास्तरावर ,सर्व शासकीय
कार्यालये, अनुदानित कार्यालये ,महाविद्यालये, शाळा, इत्यादी सर्व
शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये दिनांक 26 जून हा सामाजिक
न्याय दिन म्हणुन साजरा
करण्यात येतो.
दिनांक 26 जून 2019 रोजी जिल्हास्तरांवर विविध कार्यक्रमाचे आयोजन
मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आलेले आहे.
बुधवार 26 जून 2019 रोजी सकाळी 8 वाजता
महात्मा ज्योतीबा फुले यांच्या
पुतळ्यापासुन समता दिंडीचा मार्ग
महात्मा ज्योतीबा फुले पुतळा, शासकीय विश्रामगृह
समोरील मार्ग ते पावडेवाडी
नाका ते राजर्षी छत्रपती
शाहू महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत
राहणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या
हस्ते हिरवी झेंडी दाखवून
होणार असून हा कार्यक्रम खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद
अध्यक्ष, पोलीस अधिक्षक, आयुक्त
नांदेड वाघाळा महानगरपालिका नांदेड, मुख्य
कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
नांदेड या मान्यवरांच्या प्रमुख
उपस्थितीत संपन्न होणार
आहे. तसेच सकाळी 11.30 वाजता डॉ.
बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय
भवन,
सांस्कृतिक सभागृह नांदेड येथे
मुख्य कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आलेले आहे.
जवाहरलाल नेहरु
समाज कार्य नवीन नांदेड
येथे जिल्ह्यातील सर्व
महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी राजर्षी
शाहू महाराज यांचे शैक्षणीक
कार्य या विषयावर निंबध
स्पर्धा व समाजिक समता
काळाची गरज या विषयावर
वकृत्व स्पर्धा आयोजीत करण्यात
आलेली होती. या स्पर्धैत प्रथम, द्वितीय
व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या
हस्ते आयोजीत करण्यात आला
आहे. या कार्यक्रमांमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या
माहिती पुस्तिकांचे वाटप
करण्यात येणार आहे.
सामाजिक न्याय
विभागामार्फत सर्व तालुकास्तरांवर सामाजिक
न्याय दिनांचे आयोजन करण्याबाबत
जिल्हास्तरीय सामाजिक न्याय शक्ती
प्रदत्त समितीची बैठक 24 जून 2019
रोजी झाली. या बैठकीत
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिलेल्या
निर्देशानुसार जिल्ह्यातील
सर्व तहसीलस्तरावर तसेच
तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ
व वरिष्ठ महाविद्यालयात सामाजिक
न्याय दिनानिमित्त कार्यक्रम
आयोजित करण्याबाबत प्रत्येक
तालुक्यास निधी उपलब्ध करुन
देण्यात आला असून सर्व
तहसीलदार, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांना तालुक्यातील सर्व
लोकप्रतिनिधीचा सहभाग घेवून विविध
कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबतच्या
सुचना देण्यात आलेल्या आहेत.
26 जुन 2019 रोजी सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्या जातील यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन सदस्य सचिव, सामाजिक विकास शक्ती प्रदत्त समिती तथा सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment