Wednesday, June 26, 2019


राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
समता दिंडीस उत्स्फुर्त सहभाग

नांदेड, दि. 26 :- राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या 145 व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने " समता दिंडी "चे  आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला व राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते समता दिंडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले.
समाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांवर प्रकाश टाकणारा चित्ररथ आणि सामाजिक न्याय बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या घोषणांमुळे दिंडी लक्षवेधी ठरली. या विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यापासून ते आय.टी.आय. नांदेड ते शासकीय विश्रामगृह समोरील मार्ग ते पावडेवाडी नाका ते राजर्षी शाहू महाराज पुतळा येथे समता दिंडीचा समारोप राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन करण्यात आला.  
यावेळी समाज कल्याण सभापती शिलाताई निखाते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, समाज कल्याण अधिकारी अशोक गोडबोले, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, समता दूतचे प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदिंची यावेळी उपस्थिती होती.
*****


No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1158 नीती आयोगाच्या मूल्यांकनात #किनवट आकांक्षित तालुका राज्यातून चौथ्या क्रमांकावर तर देशातून 51 व्या क्रमांकावर ...