Wednesday, June 26, 2019

अर्धापूर शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरु



नांदेड, दि. 26 :-  अर्धापूर येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रियेचे अर्ज वाटप सुरु असून अर्धापूर तालुक्यातील गरीब, होतकरु विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे. 
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत या वसतिगृहात सन 2019-2020 या वर्षासाठी ही प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकानुसार राबविण्यात येणार आहे. वसतिगृहात इयत्ता आठवी, 11 वी व पदवी प्रथम वर्षे या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी प्रवेश अर्ज वाटप सुरु आहे. येथील प्रवेशित विद्यार्थ्यांना नियमानुसार मोफत निवास, भोजन व्यवस्था, इतर भत्ता देण्यात येतो. अधिक माहितीसाठी मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह सरकारी दवाखाण्याजवळ अर्धापूर येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1158 नीती आयोगाच्या मूल्यांकनात #किनवट आकांक्षित तालुका राज्यातून चौथ्या क्रमांकावर तर देशातून 51 व्या क्रमांकावर ...