Monday, June 24, 2019


कर्नल सिंग यांच्या उपस्थितीत
माजी सैनिकांची  मेळावा संपन्न
नांदेड दि 24 :-   सीएसडी कॅन्टीन नांदेड येथे लवकर सुरु करण्यात येईल, असे ले कर्नल जे बी सिंग  यांनी  सांगितले. स्टेशन हेडक्वार्टर औरंगाबाद यांच्या कार्यालयाकडून नियुक्त  ले कर्नल जे बी  सिंग  यांच्या अध्यक्षतेखाली  माजी सैनिकांचा मेळावा नुकताच येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.   
यावेळी केंद्र सरकारच्या मंजूर योजनांची रक्कमबाबत वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.  ई सी एच एस चे मेजर थापा यांनी माजी सैनिकांना मेडीसीन व इतर सुविधा मुबलक प्रमाणात  उपलब्ध असल्याबाबत सांगितले. नांदेड जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सार्जेन्ट संजय पोतदार  यांनी  विविध मागण्यांवर चर्चा केली. अखिल भारतीय माजी सैनिक संघटनेचे नांदेडचे अध्यक्ष व्यंकट देशमुख व सचिव रामराव थडके यांनी  ई सी एच एस मधील माजी सैनिकांच्या  समस्या, कर्मचारी नियुक्तबाबत मागणी  केली. 
माजी सैनिकांची व शहिद जवानांच्या  विरपत्नी यांना माहिती  देवून विविध योजना माजी सैनिकांपर्यंत पोहचवीत असल्याबाबत सांगितले. माजी सैनिकांच्या प्रलंबीत समस्या दुर करण्यासाठी व  केंद्र व राज्यशासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी असल्याचे सैनिक कार्यालयाचे कल्याण संघटक के. अे. शेटे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
या  मेळाव्यात माजी सैनिकांनी त्यांच्या लेखी मागण्या सादर केल्या.  मेळाव्यात जवळपासू  80 माजी सैनिक, विरनारी व अवलंबित उपस्थित होते.   सैनिक कार्यालयातर्फे मेळावा यशस्वी व उत्कृष्ट आयोजनासाठी सुभे मजीदवार, सुर्यंकांत कदम श्री गायकवड व श्री सुरेश टिपरसे यांनी  मेहनत घेतली. परभणी जिल्हयाचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री अंकुश पिनाटे यांच्या कडे नांदेड सैनिक कल्याण अधिकारी यांचा अतिरीक्त कार्यभार असल्याने त्यांनी केन्द्राचे अधिकारी कर्नल जे बी सिंग व त्यांचे  इतर सहयोगी अधिकारी यांनी नांदेड येथे येवून मेळावा घेतला याबाबत आभार मानले.  
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...