Thursday, September 21, 2017

"जागतिक आत्महत्या प्रतिबंध सप्ताह" संपन्न
आत्महत्येची कारणे, उपाय योजनेबाबत मार्गदर्शन
नांदेड दि. 21 :- श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे प्रकल्प प्रेरणा शेतकरी समुपदेशन व आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत जागतिक आत्महत्या प्रतिबंध सप्ताह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच संपन्न झाला. जिल्हा, तालुका व गावपातळीवर विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सप्ताह समारोप कार्यक्रमात प्रकल्प प्रेरणा कार्यक्रम अधिकारी मानसोपचार तज्ञ डॉ. प्रणद जोशी यांनी आत्महत्येची कारणे व विविध उपाय योजनेबाबत मार्गदर्शन केले. नैराश्यग्रस्त व्यक्तीला औषधोपचार व समुपदेशन वेळीच मिळाले तर आपण आत्महत्या रोखू शकतो, असे प्रतिपादन डॉ. जोशी यांनी केले.
कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गुंटूरकर यांचे सहकार्य लाभले. तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. यु. एम. इंगळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी परिचर्या महाविद्यालयातील विद्यार्थीनीने श्रीमती कुरुंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाटय व काव्यवाचन करुन जनजागृती केली. शासकीय परिचर्या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री जोशी उपस्थित होते. सुत्रसंचलन शीतल उदगीरकर यांनी केले.
हा सप्ताह साजरा करण्यासाठी प्रेरणा प्रकल्प कार्यक्रम चिकित्सालयीन मानसशास्त्र कैलास चव्हाण, परिचारिका श्रीमती रुपाली मस्के, वंदना कसपटे, राहुल कऱ्हाळे यांनी संयोजन केले.
000000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...