Saturday, July 29, 2017

दारु विक्री बंदचे आदेश
नांदेड, दि. 29 :- जिल्ह्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 97 वी जयंती मोठ्या प्रमाणावर मंगळवार 1 ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राहण्याचे दृष्टीने मंगळवार 1 ऑगस्ट रोजी दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी काढले आहेत. 
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये. यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी नांदेड यांनी मंगळवार 1 ऑगस्ट रोजी नांदेड शहर, जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालये, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील सर्व सीएल-3, एफएल-2 एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4 व एफएल / बिआर 2 विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे
0000000

No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...