Saturday, July 29, 2017

गुंडेगाव येथे कायदे विषयक शिबीर संपन्न
नांदेड दि. 29 :- ‘‘न्याय आपल्या दारी’’ या संकल्पनेतुन गुंडेगाव येथे फिरत्या लोकन्यायालयाचे फिरत्या कायदे विषयक शिबीराचे आयोजन आज करण्यात आले होते. 
          
  यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी .टी. वसावे म्हणाले, विधी सेवा प्राधिकरण पिडित गरजु नागरिकांना मोफत विधी सहाय सल्ला उपलब्ध रु देते. यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरीक, अपंग व्यक्ती, अनुसुचित जाती, जमातीतील व्यक्ती, बालक, कारागृहातील आरोपी व ज्या व्यक्तिचे वार्षिक उत्पन्न 2 लाखा पेक्षा कमी आहे अशा व्यक्तींचा विधी सहाय व सल्ला देण्यात येते.
फिरत्या लोक न्यायालयाचे पॅनल प्रमुख निवृत्त जिल्हा न्यायाधीश भीमराव नरवाडे पाटील यांनी उपस्थितांना विविध घटनांची माहिती दे आपसातील वाद वाढवत जाता ते सामोपचाराने मिटवावीत. गुंडेगाव या गावात मागील काही वर्षापासून ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध होत असल्याने गावात कुठलाही तंटा नाही याचे स्वागत करून गावकऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
तीन कोटी 15 लाख प्रकरणे न्यायालयात प्रलंबीत असून न्याय आपल्या दारी ही संकल्पना अमलात आणुन प्रलंबीत प्रकरणे लोकन्यायालयाच्या माध्यमातून तडजोडीने मिटविण्याचे आपला वेळ पैसा वाचवावा लोकन्यायालयात आपली प्रकरणे तडजोडीने मिटविल्यास त्यावर कुठल्याही न्यायालयात अप नसते. यामध्ये कुणी हारत नाही किंवा कोणी जिंकत नाही. दोघांमध्ये वाद विवाद कायमचा मिटतो. त्यामुळे लोकन्यायालयही एक सुवर्ण संधी आहे असे सांगीतले.
स्त्री भृणहत्या, हुंडाबंदी अशा विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. अॅड. एम. एल. गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तत्पुर्वी गुंडेगाव येथील माजी सरपंच दासराव हंबर्डे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी अॅड. प्रविण अयाचित, अॅड. एस. जी. इंगळे, अॅड. एस. डी. करकरे, अॅड. प्रदिप शिंदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री. हंबर्डे, दत्तराम पाटील, भगवानराव पो. पा., देवराव हंबर्डे, किसन हंबर्डे, रामराव हंबर्डे, शिवहार हंबर्डे, नामदेव हंबर्डे, श्री. ढेपे, गावातील महिला ग्रामस्थ उपस्थित होत.

00000

No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...