नांदेड विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत
नांदेड, दि. 10 : हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळावर दुपारी 2.15 वाजता आगमन झाले. हिंगोली येथील कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी नांदेड विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी नांदेड येथील विमानतळ कक्षात पदाधिकारी यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते हिंगोलीकडे रवाना झाले. हिंगोली येथील “शासन आपल्या दारी” कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सायंकाळी 5.15 वा. हेलिकॉप्टरने नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर त्यांचे शासकीय विमानाने सायं. 5.27 वा. मुंबईकडे प्रयाण झाले.
0000
छायाचित्र : पुरूषोत्तम जोशी, नांदेड
No comments:
Post a Comment