दहावी, बारावी परीक्षा केंद्रांच्या
परिसरात प्रतिबंधात्मक
आदेश
नांदेड, दि. 28 :-
जिल्ह्यात बारावीच्या
(उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र) परीक्षा केंद्र परिसरात 28 फेब्रुवारी 2017 ते
25 मार्च 2017 या कालावधीत व दहावी (माध्यमिक शालांत प्रमाणपत्र) परीक्षा केंद्र परिसरात 7 मार्च 2017 ते 1 एप्रिल 2017 या
कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले
आहे.
उच्च माध्यमिक शालांत
प्रमाणपत्र परीक्षा केंद्रावर 28 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत व माध्यमिक
शालांत प्रमाणपत्र परीक्षा केंद्रावर 7 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत होत आहेत.
या परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे
कलम 144 अन्वये सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत परीक्षार्थी व
परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर
कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील
100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स,
झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.
000000
No comments:
Post a Comment