Saturday, March 4, 2017

छत्तीसगड अल्पसंख्यांक आयोगाचे
अध्यक्ष केंम्बो यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 4 :-  छत्तीसगड राज्याच्या अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) सुरेंद्रसिंह केंम्बो हे शनिवार 11 मार्च ते मंगळवार 14 मार्च 2017 या कालावधीसाठी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 11 मार्च रोजी रायपूर येथून रात्री 10 वा. नांदेड येथे श्री गुरुगोबिंदसिंघजी भवन येथे आगमन व मुक्काम. रविवार 12 मार्च ते मंगळवार 14 मार्च या कालावधीत ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील. विशेषत: सोमवार 13 मार्च रोजी दुपारी 12 वा. अल्पसंख्यांक संवर्गातील घटकांशी संवाद साधतील. मंगळवार 14 मार्च रोजी सायंकाळी 6 वा. नांदेडहून रायपूरसाठी प्रयाण करतील.

0000000

No comments:

Post a Comment

  ‘जीडीसीए’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली अकोला, दि. ३ : जी. डी. सी. अँड ए आणि सीएचएम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ७ मा...