Friday, April 16, 2021

 

कृषि औजारे बँक योजनेचा

लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 16 :- जिल्हयातील बिलोली, लोहा, धर्माबाद, भोकर, मुदखेड तालुक्यांमध्ये मानव विकास कार्यक्रमातर्गंत कृषि औजारे बँक ही योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. प्रति तालुका दोन औजारे बँक इतके लक्षांक या कार्यालयास प्राप्त झाले आहे. तरी जास्तीत जास्त महिला शेतकरी बचतगटांनी कृषि औजारे बँक योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.टी. सुखदेव  यांनी केले आहे.

 

मानव विकास कार्यक्रम सन 2020-21 अंतर्गत निवडलेल्या तालुक्यात  प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.  या योजनेच्या माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, बिलोली, लोहा, धर्माबाद, भोकर, मुदखेड कार्यालयाशी संपर्क साधावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आत्मा अंतर्गत नोंदणीकृत महिला बचतगटांनी संबंधीत तालुका कृषि कार्यालयामध्ये 30 एप्रिल 2021 पर्यंत दाखल करावेत. तसेच लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने लक्षांकाच्या अधिन राहुन लाभार्थी निवड करण्यात येईल.  मार्गदर्शक सुचनेप्रमाणे काम पुर्ण करणाऱ्या बचतगटांना 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...