Monday, October 15, 2018


महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा (यात्रा थांबा)
17 ऑक्टोंबरला नांदेड येथे
नांदेड दि. 15 :- "महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा" बुधवार 17 ऑक्टोंबर 2018 रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, बाबानगर नांदेड येथे सकाळी 9.30 वा. आयोजित केली आहे. विविध स्तरावरील व्यवसाय / उद्योग यासंबंधीत संकल्पनेसह विद्यार्थी व नव उद्योजकांनी येथे सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक संचालक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नांदेड यांनी केले आहे.
उद्योग मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात 3 ऑक्टोंबर ते 3 नोव्हेंबर 2018 या कालावधीत "महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रा"चे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा या उपक्रमांतर्गत स्टार्टअप व्हॅनच्या माध्यमातून राज्यातील जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संस्थेच्या मदतीने स्टार्टअप व उद्योजकता विषयक जनजागृती स्टार्टअप विश्वातील नामांकित यशोगाथा व उद्योजकता विकास विषयक माहिती देण्यात येणार आहे.
स्टार्टअप या विषयातील मार्गदर्शन, संसाधने, इन्क्युवेटर, ॲक्सेलरेटर यासारखे स्टार्टअपशी संबंधित विविध कार्यक्रम, निधी मिळविण्यासाठी सर्वात महत्वाची प्रक्रिया आणि स्टार्टअपशी इको सिस्टिमकडून स्टार्टअप्सना मिळणारे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...