Monday, October 15, 2018


दिव्यांग मतदार नोंदणीसाठी
शुक्रवारी नांदेड येथे विशेष शिबीर  
नांदेड दि. 15 :- एक जानेवारी 2019 रोजी 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या दिव्यांग नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय बालाजी मंदिराच्यामागे, मगनपुरा नवा मोंढा नांदेड येथे शुक्रवार 19 ऑक्टोंबर 2018 रोजी आयोजित शिबिरात दुपारी 12 ते 5 यावेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची मतदार यादीत नोंद करणे व मतदारामध्ये मतदान, निवडणूक विषयी जनजागृतीसह मतदार यादीत दिव्यांग मतदाराचे नाव नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या व ज्या 18 वर्षे पूर्ण दिव्यांग नागरीकांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाहीत अशा सर्व दिव्यांग नागरिकांचे नाव मतदार यादीत नोंद होणे आवश्यक आहे. यासाठी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय नांदेड या विद्यालयात शुक्रवार 19 ऑक्टोंबर 2018 रोजी दुपारी 12 ते 5 या कालावधीत विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. पासपोर्ट आकाराचे कलर छायाचित्र, रहिवास पुरावा जसे शिधावाटप पत्रिका, वाहनचालन परवाना, पारपत्र, बँकेचे पासबुक इत्यादी. जन्म तारखेचा पुरावा- जन्म प्रमाणपत्र, जन्म तारीख नमूद केलेला शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड व वाहन परवाना इत्यादी. दिव्यांगासाठी काम करणाऱ्या शाळा, संस्थांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि स्वयंसेवी संघटनांनी त्यांच्या संलग्नीत दिव्यांग नागरिकांना या शिबिराबाबत माहिती दयावी, असेही आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...