Thursday, February 1, 2018

अल्पसंख्यांक पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्तीचे  
ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 1 :- स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील महाविद्यालयात इयत्ता बारावी नंतर सर्व अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी अल्पसंख्यांक पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. संबंधीत विद्यार्थ्यांचे नवीन मंजुरी व नुतनीकरणाचे अर्ज ऑफलाईन मागविण्यात येत आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थाप्रमुख यांनी महाविद्यालयातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना ऑॅफलाईन अर्ज भरण्यासाठी योग्य प्रयत्न करावेत, असे आवाहन उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. शैला सारंग यांनी केले आहे.
शासकीय, अशासकीय, कनिष्ठ, वरिष्ठ, कला, वाणिज्य, विज्ञान अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये तसेच व्यवसायिक महाविद्यालयातील इयत्ता 12 वी नंतरच्या सर्व अभ्यासक्रमा(कला, वाणिज्य, विज्ञान, पदवी व पदव्युत्तर) शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. शिष्यवृत्तीसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसीत केलेल्या MahaDBT पोर्टलव्दारे सन 2017-18 या वर्षासाठी ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. या विद्यार्थ्यांचे  शिष्यवृत्ती अर्ज ऑफलाईन पध्दतीने विहित नमुन्यात सादर करावीत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...