Friday, May 18, 2018


कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक
आरक्षण सोडतीचे आज आयोजन  
संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

        नांदेड, दि. 18 :- मुदखेड व धर्माबाद कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या निवडणूककामी बाजार क्षेत्रातील आरक्षण सोडत जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निल्‍हा ामीी ‍पन्‍न बाजार समिती -------------------------------------------------------------------------
वडणूक अधिकारी (कृउबास) यांचे अध्‍यक्षतेखाली शनिवार 19 मे 2018 रोजी सकाळी 11 वा. बचत भवन जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड काढण्‍यात येणार आहे. सर्व संबंधीत व्‍यक्‍तींन सदर आरक्षण सोडतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्‍ट्र राज्‍य पुणे यांचे आदेशान्वये कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या निवडणकीकरीता जिल्‍हाधिकारी नांदेड यांना जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृउबास) म्‍हणून घोषीत केले आहे. त्‍यानुषंगाने दिनांक 31 डिसेंबर 2017 अखेर मुदत संपणाऱ्या नांदेड जिल्‍ह्यातील मुदखेड व धर्माबाद कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीची निवडणूक प्रक्रीया घेण्‍याचे प्राधिकरणाचे निर्देश आहेत.
            मुदखेड कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या कार्यक्षेत्रात एकुण 17 गावे समाविष्‍ट असून धर्माबाद कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या कार्यक्षेत्रात एकुण 56 गावे समाविष्‍ट आहेत. राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांचे दिनांक 5 डिसेंबर 2017 च्‍या आदेशानुसार गावातील गावनिहाय खातेदारांची संख्‍या विचारात घेवून सदर गावाचे एकुण 15 गणांमध्ये (विभाग) विभाजन करून महाराष्‍ट्र कृषी उत्‍पन्‍न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 13 (1) मधील तरतूदीनूसार 15 गणापैकी महिलांसाठी – 2 गण,  इतर मागासवर्गीयांसाठी – 1 गण, विमुक्‍त जाती / भटक्‍या जमाती साठी – 1 गण, अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीसाठी 1 गण असे एकुण 5 गणांचे आरक्षण लॉटरी पध्‍दतीने जाहीर करावे. तसेच गणाचे आरक्षण काढताना संबंधीत बाजार क्षेत्रातील  लोकसभा / राज्‍यसभा सदस्‍य,  विधानसभा / विधानपरिषद सदस्‍य, जिल्‍हा परिषद सदस्‍य, पंचायत समिती पदाधिकारी, संबंधीत बाजार समितीचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत जाहीर करण्‍याचे निर्देश आहेत.
        त्यानुषंगाने मुदखेड व धर्माबाद कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या निवडणूककामी बाजार क्षेत्रातील आरक्षण सोडत जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निल्‍हा ामीी ‍पन्‍न बाजार समिती -------------------------------------------------------------------------
वडणूक अधिकारी (कृउबास) यांचे अध्‍यक्षतेखाली दिनांक 19 मे 2018 रोजी सकाळी 11 वा. बचत भवन जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड काढण्‍यात येणार असून उपरोक्‍त सर्व सन्‍माननीय व्‍यक्‍तींना सदर आरक्षण सोडतीस उपस्थित राहण्‍याचे जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी आवाहन केले आहे.
0000000



No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...