Friday, January 8, 2021

 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने

जिल्ह्यात दारु विक्री बंदचा आदेश

नांदेड, दि. 8 (जिमाका) :- जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष) एफएल / बीआर-2 अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. 

जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2020-21 संदर्भात 15 जानेवारी रोजी मतदान व 18 जानेवारी रोजी मतमोजणी होत आहे. ग्रामपंचायत मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी तसेच शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आदेश निर्गमीत केले आहेत. जिल्ह्यात मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदार म्हणजे 13 जानेवारी 2021 रोजी सायं. 5.30 वाजेपासून मतदानाच्या अगोदरचा दिवस 14 जानेवारी संपूर्ण दिवस, मतदानाचा दिवस 15 जानेवारी रोजी सायं. 5.30 पर्यंत अनुज्ञप्ती बंद राहतील. तसेच मतमोजणी होत असलेल्या शहर व तालुक्याच्या ठिकाणी 18 जानेवारी रोजी मतमोजणीची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.  या आदेशाचा भंग केल्यास अनुज्ञप्तीधारका विरुद्ध कायदेशिर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  696     जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची बैठक संपन्न   नांदेड ,  दि. 3 जुलै :- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच...