Tuesday, October 26, 2021

सुधारीत वृत्त 

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकरिता नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सशुल्क विशेष वाहन सेवा 

नांदेड, (जिमाका) दि. 26 :- देगलूर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक शनिवार  दिनांक  30 ऑक्टोबर रोजी  मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या  प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडून सशुल्क बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

देगलूर व बिलोली  हे दोन तालुके वगळता उर्वरित 14 तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या बस स्थानकांवरून  दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी देगलूर येथे निवडणुकीच्या कर्तव्यावर जाण्यासाठी ही बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

30 ऑक्टोबर रोजी मतदानाची कार्यवाही संपल्यानंतर देगलूर तहसील कार्यालय परिसरातून मुख्यालयात परत जाण्यासाठी ही सशुल्क बस सेवा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन  इटनकर यांनी दिली आहे. 

नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने सदर बससेवेचा वापर करावा असे आवाहन  प्रसिध्दी पत्रकाव्दारे करण्यात आले आहे .

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...