Saturday, November 16, 2019


जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड मार्फत
राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त रॅली संपन्न
नांदेड दि. 16 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिपक धोळकिया यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त नालसा. व मालसा. यांचेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना व दिल्या जाणाऱ्या मोफत विधी सहाय्याबाबत माहिती देण्यासाठी आज जिल्हा न्यायालय परिसर ते आयटीआय कॉर्नर पर्यत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीचे उद्घाटन माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे, गुरुद्वारा लंगर साहिबजी संतबाबा बलविंदर सिंघजी, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, वकिल संघाचे अध्यक्ष मिलींद लाठकर, जिल्हा सरकारी वकिल आशिष गोधमगावकर यांचे हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवुन रॅली मार्गस्थ करण्यात आली.
यावेळी जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीश, वकिल संघाचे सदस्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे पॅनल विधीज्ञ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोंडेकर, अप्पर पोलीस अधिक्षक राठोड, औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे एस. एस. परगने, प्राचार्य डब्लु. एम. फारुकी, गटनिदेशक श्रीमती. उषा सरोदे, स्वा.रा.ती.विद्यापीठाचे समाजशास्त्र विभाग, विधी स्वयंसेवक, न्यायालयीन कर्मचारी, नांदेड येथील जिल्हा परिषद व इतर शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
या रॅलीचा समारोप औद्योगीक प्रशिक्षण संस्था नांदेडच्या प्रांगणात करण्यात आला. औद्योगीक प्रशिक्षण संस्थेने त्यांचे प्रांगण उपलब्ध करुन दिले. श्री गुरुद्वारा लंगर साहिबजीच्यावतीने रॅलीच्या समारोपप्रसंगी रॅलीमधील सर्व उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, नागरिकांना अल्पोपहाराची व्यवस्था केली. शहर पोलीस व शहर वाहतुक शाखेने या रॅलीची सुरक्षा व सुव्यवस्था पाहिली. ही रॅली यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल उपस्थित मान्यवर, विद्यार्थी व ज्यांचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहकार्य लाभले त्यांचे सर्वांचे सहकार्याबद्दल जि.वि.से.प्रा.चे सचिव आर. एस. रोटे यांनी आभार मानले.  
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...