Saturday, November 16, 2019


मतदार यादीचा विशेष संक्षिप्‍त पुन:निरीक्षण कार्यक्रम जाहीर
नांदेड दि. 16 :-  नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण मतदारसंघातील मतदार यादीत मतदार यादी दुरुस्‍तीसाठी भारत निवडणूक आयोग यांनी पुढीलप्रमाणे कार्यक्रम 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर  आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्‍त  पुन:निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.
पुर्व पुन:निरिक्षण कार्यक्रम मतदार पडताळणी कार्यक्रम (EVP) कॅम्‍पेन मोडमध्‍ये स्‍वीपच्‍या मदतीने आणि मतदान केंद्राचे सुसूत्रिकरण व प्रमाणीकरण सारख्‍या इतर पुर्व-पुनरिक्षण कार्यक्रम सोमवार 11 नोव्‍हेबर ते शुक्रवार 20 डिसेंबर 2019 कालावधीत. इंटिग्रेटेड प्रारुप मतदार यादयांची प्रसिध्दी सोमवार 30 डिसेंबर 2019 रोजी. दावे व हरकती स्‍वीकारण्‍याचा कालावधी सोमवार 30 डिसेंबर 2019 ते गुरुवार 30 जानेवारी 2020. विशेष मोहिम शनिवार 4 जानेवारी 2020 आणि रविवार 5 जानेवारी 2020, शनिवार 11 जानेवारी  आणि रविवार 12 जानेवारी 2020. दावे व हरकती निकाली काढणे सोमवार 10 फेब्रूवारी 2020 पूर्वी. प्रारुप मतदार यादीच्‍या मापदंडाची तपासणी करणे आणि मतदार यादीच्‍या अंतिम प्रसिध्‍दी करीता आयोगाची परवानगी घेणे गुरुवार 20 फेब्रूवारी 2020 पूर्वी. डाटाबेसचे अदयावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई बुधवार 28 फेब्रुवारी 2020 पूर्वी. मतदार यादीची अंतिम प्रसिध्‍दी सोमवार 2 मार्च 2020 होणार आहे.
मतदारांना सूचना प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात येत असून महानगर पालिका क्षेत्रातील विविध प्रभागात याद्यांचे वाचन करून प्रसिद्धी देण्यात येणार आहे. या कालावधीत मतदारांनी फॉर्म नं. 6, 7, 8, 8अ तहसिल कार्यालय, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा मनपा नोडल अधिकारी यांच्याकडे जमा करावेत किंवा मतदार नोंदणीसाठी www.nvsp.in या वेबसाईडवर/संकेतस्‍थळावर प्राधान्‍याने ऑनलाईन फॉर्म भरावे. मतदारांना यादीची पाहाणी करुन विहीत मुदतीत मतदार यादीतील दुरुस्‍ती बाबतची कार्यवाही करुन राष्ट्रीय मतदार यादी कार्यक्रमास सहकार्य करावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...