चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आज उद्घाटन
नांदेड दि. 16 :- महिला व बाल विकास विभागांतर्गत शासकीय,
स्वयंसेवी संस्थांमध्ये दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त
गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण
होण्यासाठी रविवार 17 नोव्हेंबर 2019 रोजी जनकल्याण बहु. प्रति. संच लहुजी साळवे
नि. नि. बालकाश्रम वाडीपाटी साईबाबा मंदिराच्या बाजुला वसंत हायस्कुल जवळ नांदेड
येथे चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन सकाळी 10 वा. करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी
अरुण डोंगरे राहणार असून उद्घाटन म्हणून पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांची
उपस्थित राहणार आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती
अर्चना पाटील, औरंगाबाद महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपायुक्त एम. के.
सिरसाट, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष श्रीमती डॉ. निरंजन कौर सरदार यांची प्रमुख
उपस्थिती राहणार आहे.
हा कार्यक्रम तीन
दिवसांचा राहणार असून यात बालकांच्या विविध खेळांच्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला बाल विकास अधिकारी
श्रीमती आर. पी. काळम यांनी दिली आहे.
00000
No comments:
Post a Comment