घरोघरी
जाऊन विधी सेवा प्राधिकरणाच्या
विविध योजनांच्या
माहितीचा कार्यक्रम
नांदेड
दि. 16 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई
यांचे आदेशान्वये व प्रमुख जिल्हा न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष
दि. अ. धोळकिया यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड
कार्यालयामार्फत कायदेविषयक सेवा दिनानिमित्त
नांदेड
तालुक्यातील पुयनी येथे विधी सेवा प्राधिकरणाचे
पॅनल विधीज्ञ मुकूंद वाकोडकर, पॅनल
विधीज्ञ श्री. पावडे, पॅनल विधीज्ञ सुभाष
बेंडे यांनी लहान मुलांचे संरक्षण आणि विधी सेवा योजना या विषयावर घरोघरी जाऊन
विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत विधी सहाय्याबाबत व नुकसान भरपाई
बाबत योजनांची माहिती 11 नोव्हेंबर रोजी दिली. या कार्यक्रमामध्ये त्या परिसरातील 400
ते 450 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
नांदेड तालुक्यातील तरोडा (खु) व
पासदगाव या भागात विधी सेवा प्राधिकरणाचे पॅनल विधीज्ञ श्री. जामकर,
पॅनल विधीज्ञ श्रीमती. स्वाती कुलकर्णी तसेच श्रीमती अनुराधा मठपती,
सामाजिक कार्यकत्र्या यांनी मानसिक रोगी व मानसिकरित्या असक्षम
व्यक्तीसाठी विधी सेवा योजना या विषयावर घरोघरी जाऊन माहिती 12 नोव्हेंबर 2019 रोजी दिली. तसेच उपस्थितांना विधी
सेवा प्राधिकरणामार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत विधी सहाय्याबाबत व नुकसान भरपाई
बाबतच्या योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमामध्ये त्या परिसरातील 100 ते 200 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
नांदेड तालुक्यातील सांगवी (बु),
तरोडा व कामठा या भागात विधी सेवा प्राधिकरणाचे पॅनल विधीज्ञ
श्रीमती. फेरोजा हाश्मी, पॅनल विधीज्ञ श्रीमती. संध्या सावंत,
पॅनल विधीज्ञ श्रीमती सुकेशिनी गेडाम, पॅनल
विधीज्ञ श्रीमती फातेमातुल सना, पॅनल विधीज्ञ श्रीमती रतन
चाहेल तसेच स्वयंसेविका प्रियंका पवार यांनी गरिबी निर्मलनासाठी प्रभावी अंमलबाजावणी
योजना या विषयावर घरोघरी जाऊन 13 नोव्हेंबर 2019 रोजी माहिती दिली. उपस्थितांना विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिल्या जाणाऱ्या
मोफत विधी सहाय्याबाबत व नुकसान भरपाई बाबतच्या योजनांची माहिती दिली. या
कार्यक्रमामध्ये परिसरातील 800 ते 810 लाभार्थ्यांनी
लाभ घेतला.
या कार्यक्रमाअंतर्गत नांदेड तालुक्यातील इतर गावात व नांदेड
शहरातील इतर भागात होणाऱ्या शिबीराचा जास्तीतजास्त लोकांनी लाभ घ्यावा,
असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे
अध्यक्ष दि. अ. धोळकिया, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस.
रोटे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment