Friday, July 7, 2017

जीएसटीमुळे रासायनिक खताच्या किंमती कमी
खत विक्रेत्यांना जीएसटीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन
नांदेड दि. 7 :- गुडस न्ड सर्व्हिस टॅक्स (GST) लागु होण्यापूर्वी रासायनिक खतावर 1 टक्के उत्पादन शुल्क (Excise Duty) 5 टक्के मुल्य आधारीत कर (VAT) लागु होता. मात्र दिनांक 1 जुलै 2017 पासून अनुदानीत रासायनिक खतावर सरसकट 5 टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनुदानीत रासायनिक खताच्या किंमती 1 जुलै 2017 पासून कमी झाल्या आहेत. घाऊक किरकोळ विक्रेत्यांना जीएसटीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.
किरकोळ, घाऊक खत विक्रेत्यांनी कमी झालेल्या दराबाबत ग्रेडनिहाय दर, दरफलकावर प्रदर्शित करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना नवीन दराने खताची खरेदी करावी.  खतावरील जीएसटी बाबतच्या शंकांचे निरसन करण्यासाठी केंद्र शासनाने मदत दुरध्वनी क्रमांक दिलेला आहे. त्यांचा नंबर 011-26106817 हा आहे. खतावरील जीएसटीबाबत शंका असल्यास प्रश्न विचारुन शंकानिरसण करुन घेता येईल. हा मदत क्रमांक केंद्र शासनाने fert.nic.in या संकेतस्थळावर सुध्दा प्रसिद्ध केला आहे. या व्यतिरिक्त केंद्र शासनाने सर्वसाधारण जीएसटीबाबत येणाऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी पुढील दुरध्वनी क्रमांक मदत केंद्रे म्हणून जाहीर केले आहेत. 011-23094160, 011- 23094161, 011- 23094162, 011- 23094168, 011- 23094169. अशी माहिती कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी दिली आहे.

0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...