Friday, July 7, 2017

मी मुख्यमंत्री बोलतोय
दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन रविवारी प्रसारण
कर्जमाफीविषयक प्रश्नांना सडेतोड उत्तरे

नांदेड , दि. 7 : कर्जमाफी सरसकट का नाही, कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांचे काय, 34 हजार कोटींचा मेळ कसा घातला, कर्जमाफीने शेतकरी सुखी होईल काय, प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय का…. शेतकरी कर्जमाफी संदर्भातील अशा विविध प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली आहेत. येत्या रविवारी 9 जुलै 2017 रोजी मी मुख्यमंत्री बोलतोयकार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्यांना पडलेल्या या प्रश्नांना उत्तरे मिळणार आहेत.  
राज्यातील जनतेला थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देणाऱ्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे निर्मित मी मुख्यमंत्री बोलतोयकार्यक्रमाच्या शेतकरी कर्जमाफीया विषयावरील पहिल्या भागाचे येत्या रविवारी म्हणजे 9 जुलै 2017 रोजी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन सकाळी 10 वाजता प्रसारण होणार आहे. मुंबई दूरदर्शनवरील सह्याद्री वाहिनी, झी 24 तास आणि साम टिव्ही या वाहिन्यांवरुन सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण होईल. याच दिवशी सकाळी 10.30 वाजता झी मराठी वाहिनीवर त्याचे प्रसारण होईल. 
आकाशवाणीवरुनही होणार प्रसारण
या कार्यक्रमाचे पुन:प्रसारण सोमवार दिनांक 10 जुलै 2017 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन सायंकाळी 5.30 वाजता होईल. आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरुन या कार्यक्रमाचे प्रसारण सोमवार दि. 10 जुलै, मंगळवार दि. 11 जुलै व बुधवार दि. 12  जुलै रोजी सकाळी 7.25 वाजता होईल. 
या कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफी संदर्भात राज्यभरातील लोकांनी विचारलेल्या तसेच कार्यक्रमाच्या चित्रीकरणावेळी उपस्थित असलेल्या श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली आहेत. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाआधी ई-मेल आणि एसएमएसवरुन लोकांकडून या विषयावर प्रश्न मागविण्यात आले होते. त्याला राज्याच्या विविध भागातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साधारण 20 हजाराहून अधिक जणांनी यात सहभाग घेऊन शेतकरी कर्जमाफी, कर्ज पुनर्गठन, शेतमालाला हमीभाव, नवीन पीक कर्ज अशा विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रश्न विचारले होते. यातील निवडक प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात उत्तरे दिली आहेत. 
व्यवसाय अडचणीत आला म्हणून कर्ज माफ करणे योग्य आहे काय, प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय का, कर्जमाफी सरसकट का नाही, कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांचे काय, 40 लाखांचा आकडा कोठून आला, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्त फायदा ?, 34 हजार कोटींचा मेळ कसा घातला, जॉईंट अकाऊंट खातेदारांना काय फायदा होणार, चुकीच्या लोकांना लाभ मिळणार नाही याची काय खात्री, कर्जमाफीने शेतकरी सुखी होईल काय अशा विविध प्रश्नांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या कार्यक्रमात उत्तरे दिली आहेत. 
0000000


No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...