Friday, July 7, 2017

जिल्ह्याचा राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचा आराखडा मंजूर
विविध योजनेच्या लाभासाठी 31 जुलै पर्यंत अर्जाची मुदत
नांदेड, दि. 7 :-  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन 2017-18 साठी रु. 222.12 लाखाचा आराखडा नांदेड जिल्ह्यासाठी मंजुर झाला आहे. त्यामध्ये अनुसुचीत जातीसाठी रु. 58.70 लाख, अनुसुचीत जमातीसाठी रु. 33.37 लाख सर्वसाधारणसाठी - रु. 130.86 लाख अनुदान असा आर्थिक कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या योजनेंतर्गत क्षेत्रविस्तार (आंबा घनलागवड, पेरु घनलागवड), पुष्पोत्पादन (सुटीफुले, कंदफुले, कटफुले), सामुहीक शेततळे, यांत्रिकीकरण (ट्रॅक्टर 20 एच.पी. पर्यंत), हरीतगृह, हरीतगृहातील भाजीपाला लागवड, शेडनेट, शेडनेटमधील फुले लागवड, पॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रीया केंद्र, कांदाचाळ, रायपनींग चेंबर, कोल्ड स्टोरेज, मोबाईल प्रिकुलींग युनिट आदी बाबींचा समावेश आहे.
त्याचबरोबर राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत फलोत्पादन यांत्रिकीकरण प्रकल्प राबविणेसाठी नांदेड जिल्ह्यासाठी रु.27.91 लाखाचा कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या प्रकल्पांतर्गत ट्रॅक्टर (20 अश्वशक्ती पर्यंत), पॉवर टिलर (8 अश्वशक्ती पेक्षा कमी), पॉवर टिलर (8 अश्वशक्ती पेक्षा जास्त), 20 एच.पी. पर्यंत ट्रॅक्टर / पॉवर टिलर चलीत अवजारे (नांगर, डिस्क नांगर, कल्टीव्हेटर, लेव्हलर ब्लेड, रिजर, पेरणी यंत्र इ.) या बाबींचा समावेश आहे.
या घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी www.hortnet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुकांनी वरील प्रत्येक बाबीकरिता स्वतंत्रपणे ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्यास अडचण येत असेल तर आपल्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन अर्ज भरुन घ्यावा. योजनेच्या सविस्तर माहितीसाठी लाभार्थ्यांनी संबंधीत तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा.
जिल्हा अभियान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत प्राप्त उद्दीष्टाच्या अधीन राहुन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येणार आहे. तरी योजनेचा लाभ घेणेसाठी लाभार्थ्यांनी सोमवार 31 जुलै 2017 पर्यंत संकेतस्थळावर नोंदणी करुन स्कीम  फाईल करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...