वृत्त
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नामतालिकेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
लातूर,दि.3 (विमाका):- बहुराज्य सहकारी संस्था अधिनियम 2002 च्या कलम 84 (4) अन्वये 2022-2025 या कालावधी लवाद नामतालिका (Arbitrator Pane) तयार करण्यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन लातूर येथील सहकारी संस्थाच्या विभागीय सहनिबंधक सचिन रावल यांनी केले आहे.
सर्व न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश आणि सेवानिवृत्त विधी अधिकारी, प्रॅक्टीसिंग ॲडव्होकेटस, चार्टर्ड अकौंन्टंट, कॉस्ट अकौंन्टंट, राष्ट्रीय बँका, ग्रामीण बँका, भू विकास बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँका, नागरी सहकारी बँका, राज्य सहकारी बँका यांचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी (ज्यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे).
सहकार विभागातील उपनिबंधक दर्जा पेक्षा वरच्या दर्जाचे सेवानिवृत्त अधिकारी (ज्यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे) तसेच अशा व्यक्तींची नियुक्ती करताना उक्त अधिनियमामध्ये नमूद नसले तरीही पुढीलप्रमाणे जादा अर्हता, पात्रता असाव्यात. त्यांच्यावर कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे दाखल नसावेत. शासकीय, बँक सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी यांची कोणत्याही प्रकारची खाते निहाय चैाकशी चालू नसावी आणि सेवेत कोणताही ठपका ठेवलेला नसावा. अशी व्यक्ती कोणत्याही काळ्या यादीत (Black List) मध्ये समाविष्ट नसावी.
या व्यक्ती संबंधीत विभागाच्या विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जिल्ह्यातील
रहिवासी असावा. (नांदेड, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील). व्यक्ती एकावेळी एकाच विभागातून
अर्ज दाखल करु शकते. अर्जाचे विहीत नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर विभाग लातूर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दूसरा मजला, शिवाजी चौक लातूर ता.जि.लातूर या कार्यालयात दि. 31 डिसेंबर -2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत दिनांक 31 डिसेंबर-2021 राहील. प्राप्त अर्जाची छाननी पूर्ण करुन दि.14 फेब्रुवारी-2022 रोजी प्रारुप लवाद नामतालिका प्रसिध्द होईल. ही प्रारुप नामतालिका यादी संबंधित विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात लावण्यात येईल. प्रारुप नामतालिकावर हरकती असल्यास drcslaw@gmail.com या ई-मेलवर पुराव्यासह हरकती दि.21 फेब्रुवारी-2022 पर्यंत सादर करता येतील. हरकतीचा निर्णय करुन दि.18 मार्च-2022 रोजी अंतीम लवाद नामतालिका प्रसिध्द करण्यात येईल. याबाबतची जाहिर सूचना कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
00000
No comments:
Post a Comment