Monday, May 7, 2018


जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या विद्यमाने

आजिवीका कौशल्य विकास  दिवस  उत्साहात साजरा

            नांदेड,दि.7:- ग्रामस्वराज अभियानांतर्गत केंद्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार दिनांक 14 एप्रिल, 2018 ते 5 मे, 2018 दरम्यान जिल्हयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणुन महाराष्ट्र राज्य ग्रामी जिवनोन्नती अभियानांतर्गत आजिवीका कौशल्य विकास दिवस दिनांक 5 मे, 2018 रोजी जिल्हा स्तरावर सहयोग कॅम्पस, विष्णुपूरी नांदेड येथे साजरा करण्यात आला.

       दिनदयाल उपाध्याय ग्रामिण कौशल्य योजने अंतर्गत पेस आय टी एज्युकेशनल इन्स्टीटयुशनल सोसायटीचे महेश हिंगोले यांनी संस्थेमार्फत देण्यात येणा-या विविध अभ्यासक्रमांची माहिती उपस्थितांना दिली तसेच  विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याना प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. कांही यशस्वी विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले.

            आरसेटी अंतर्गत शेळीपालन व्यवसायाचे प्रशिक्षण घेतलेल्या स्वरोजगारींना प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर आरसेटी मार्फत देण्यात येणा-या विविध प्रशिक्षणाची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.

            या आजिवीका दिवस कार्यक्रमात स्वयंसहायता समूहातील 215 महिलांनी आपला सहभाग नोंदविला. स्वंयसहायता समूहासाठी काम करणाऱ्या सी.आर.पी.नी आपले मनोगत व्यक्त केले.

            बार्टीच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती पोहरे यांनी महिला सक्षमीकरणा बाबत मार्गदर्शन केले. तसेच जे.जे. चे           श्री. संगमेश्वर श्री. संजय संकपाल रिजनल एज्यूकेशनल सोसायटी हैद्राबाद यांनी सहभाग नोंदविला.       

            सदरील कार्यक्रमास भारत सरकारचे केंद्रिय निरिक्षक सुब्रमण्यम रेड्डी,यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अखिल सक्सेना वाणिज्य विभाग भारत सरकार उपसचिव मुरलीधर मिश्रा यांनी स्वयंसहायता समुहांना विद्यार्थ्यांना  भावी कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.

            कार्यक्रमाचा समारोप करताना जिल्हा रिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी यांनी नवयुवकांनी नोकरीच्या मागे लागता व्यवसायात उतरावे असे अवाहन केले. जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी .का.अ.(पं.) व्हि.आर.कोंडेकर, यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन केल्यामूळे जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जि.ग्रा.वि.यं. सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ.प्रविणकुमार घुले यांनी केले.

तसेच वि.अ. जी.व्हि.पातेवार, जि.ग्रा.वि.यं. धनंजय देशपांडे, गंगाधर राऊत, (एमएसआरएलएम)  तालुकाव्यवस्थापक श्रीमती प्रणिता जाधव, महेश हिंगोले इतर कर्मचारी पेस आय. टी. एज्युकेशनल इन्स्टीटयुशनल सोसायटी यांनी कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी  परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सहयोग सेवाभावी संस्था विष्णुपूरी  नांदेड यांनी सभागृह उपलब्ध करुन देवून सहकार्य केले.

 

****





No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...